UGC NET JRF परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

UGC NET Admit Card Download 

यूजीसी नेट डिसेंबर २०२१ ही ९,११,१२ जुलै २०२२ आणि आणि जून २०२२ परीक्षा ही १२,१२,१४ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित केल्या जाणार आहे. असल्याचे. दरम्यान यूजीसी नेट जेआरएफ परीक्षेच्या प्रवेशपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांसाठी एनटीएने प्रवेशपत्र जाहीर केले आहे. एनटीएने यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे.

 • नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) कडून यूजीसी नेट डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ परीक्षा या ९,११,१२ जुलै २०२२ आणि १२,१२,१४ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित केल्या जाणार आहे.
 • दरम्यान यूजीसी नेट जेआरएफ परीक्षेच्या प्रवेशपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो उमेदवारांसाठी एनटीएने प्रवेशपत्र जाहीर केले आहे.
 • एनटीएने यासंदर्भात अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे.
 • संबंधित विषयासाठी ९ जुलै २०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेचे प्रवेशपत्र एनटीएची वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध आहे.
 • उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून वेबसाइटवरून संबंधित विषयासाठी त्यांचे संबंधित प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
 • प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात कोणतीही अडचण आल्यास किंवा त्यात असलेल्या डेटामध्ये कोणतीही त्रुटी असल्यास, उमेदवार दुरूस्तीसाठी एनटीएच्या हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात.
 • एनटीएकडून ०११-४०७५ ९००० हा क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.
 • तसेच ugcnet@nta.ac.in यावर ई-मेल देखील करता येईल.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार ११ आणि १२ जुलै २०२२ रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी संबंधित विषयाचे प्रवेशपत्र एनटीएची वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर लवकरच जाहीर केले जाणार आहे.संबंधित शहरासाठी नंतरच्या तारखांना होणाऱ्या परीक्षेसाठी शहराची माहिती, विषयनिहाय स्लिप आणि प्रवेशपत्र दिले जाणार आहे.

NTA ने जाहीर केलेली महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे

 • परीक्षेला बसण्यासाठी पात्रता अटी पूर्ण केल्या असतील तर उमेदवारांना तात्पुरत्या स्वरूपात प्रवेशपत्र दिली जातील.
 • प्रवेशपत्र एनटीएकडून प्रवेशपत्र पोस्टाने पाठवले जाणार नाही.
 • उमेदवाराने प्रवेशपत्र जवळ ठेवावे आणि त्यात दिलेली कोणतीही नोंद, माहिती बदलण्याचा प्रयत्न करू नये.
 • भविष्यातील संदर्भासाठी उमेदवारांना त्यांच्या प्रवेशपत्राची एक प्रिंट चांगल्या स्थितीत सुरक्षित ठेवावी.
 • उमेदवारांना एनटीएची अधिकृत वेबसाइट nta.ac.in किंवा ugcnet.nta.nic.in वर ताज्या अपडेट पाहता येणार आहेत.

अधिकृत वेबसाईट – nta.ac.in