जीवन विमा चे  प्रकार आधी जाणून घ्या आणि मगच निर्णय करा

 insurance types

मुदत विमा योजना

टर्म इन्शुरन्स प्लॅन अंतर्गत भविष्यात तुम्हाला काही झाले तर त्यामुळे तुमच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण मिळते. व्यक्तीला आर्थिक संरक्षण देण्याचा हा एक सोपा आणि कीफायातशिर मार्ग मानला जातो. टर्म इन्शुरन्स संपूर्ण संरक्षण योजना आहे आणि ती बाजाराची जोडली नाही. याशिवाय मुदत विम्याच्या प्रीमियम इतर कोणत्याही जीवन विमा पेक्षा कमी असतो.

युलीप ( युनिट लिंक्ड विमा योजना )
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लान मध्ये विमा आणि गुंतवणूक दोन्ही सामाविष्ट असतात. या अंतर्गत तुमच्या प्रियजनांना  आर्थिक सुरक्षेतेचा लाभ मिळतो. यासोबतच दीर्घकालीन पैसा जमा होण्यास मदत मिळते.


बचत आणि गुंतवणूक योजना
या प्रकारची जीवन विमा योजना विमाधारक आणि त्यांच्या कुटुंबाला भविष्यातील खर्चासाठी एक रक्कमी निधीची हमी देते. अशा योजना केवळ अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उत्तम बचत साधनेच देत नाहीत. तर तुमच्या कुटुंबाला विमा सुरक्षा च्या स्वरूपात विशिष्ट रकमेची हमी देतात. या प्रकारच्या जीवा मी मास्त्रेणीमध्ये पारंपारिक आणि युनिट लिंक्ड अशा दोन्ही योजनांचा समावेश होतो.

बाल विमा पॉलिसी
मुलाच्या शैक्षणिक खर्च आणि इतर गरजा लक्षात घेऊन या योजना तयार करण्यात आल्या आहेत. विमा पॉलिसी मध्ये पॉलिसी धारकाच्या मृत्यू नंतर एक करत मी रक्कम दिली जाते पण पॉलिसी लॅप्स होत नाही. भविष्यातील सर्व प्रीमियम माफ केले जातात आणि विमा कंपनी पळशी धारकाच्या वतीने गुंतवणूक करणे सुरू ठेवते मुलाला ठरावीक कालावधीसाठी पैसे मिळतात.

सेवानिवृत्ती योजना
या योजनेत जीवन विमा संरक्षण उपलब्ध नाही. एक निवृत्ती समाधान योजना आहे. या अंतर्गत तुम्ही तुमच्या धोक्याचे मूल्यांकन करून सेवानिवृत्ती निधी तयार करू शकता. ठराविक कालावधीनंतर तुम्हाला किंवा तुमच्या नंतरच्या लाभार्थ्यांना पेन्शन म्हणून वैशिष्ट्य रक्कम दिली जाते. यामधील पेमेंट मासिक सहामाही किंवा वार्षिक आधारावर असू शकते. 


आजीवन जीवन विमा
लाईफ लॉंग लाइफ इन्शुरन्स म्हणजे संपूर्ण जीवन विमा योजनेत तुम्हाला आयुष्यभर संरक्षण मिळते. म्हणजेच पॉलिसीला कोणतीही मुदत नाही पॉलिसी धारकांच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विमा हक्क मिळतो. इतर जीवन विमा पॉलिसी ची कमाल मावळ मर्यादा असते जी साधारणपणे 65 ते 70 वर्षे असते. त्यानंतर नॉमिनीच्या मृत्यू झालास मूर्तीचा दावा करू शकत नाही. पण लाईफ लॉंग इन्शुरन्स अंतर्गत पॉलिसी धारकाच्या वयाच्या 95 व्या वर्षी मूर्ती झाला असेल तरी नोमिनी दावा ठोकू शकतो. या पॉलिसीच्या प्रीमियम खूप जास्त आहे. या पॉलिसी अंतर्गत पॉलिसी धारकास विमा रक्कम अंशत: काढण्याचा पर्याय आहे. तो पॉलिसीवर कर्जाचा स्वरूपात पैसे देखील देऊ शकतो.

पैसे परत (मनी बॅक) विमा योजना
ही पॉलिसी फक्त एक प्रकारची एंडॉवमेंट पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक आणि विमा याचे मिश्रण आहे. फरक असा आहे की या जीवन विमा पॉलिसीमध्ये बोनसह विम्याची रक्कम पॉलिसीच्या कालावधीतच हप्त्यामध्ये परत केली जाते. शेवटच्या हप्ता पॉलिसीच्या शेवटी उपलब्ध आहे. पॉलिसी धारकाच्या पॉलिसीच्या मदतीदरम्यानम मृत्यू झाल्या संपूर्ण विमा ची रक्कम लाभार्थ्याला मिळते. मात्र या पॉलिसीचे प्रीमियम सर्वाधिक आहे

अशा प्रकारच्या नवीन अपडेट करता आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची सभासद व्हा

 👉👉 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👈👈


तसेच आपणास सदरील पोस्ट कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा
धन्यवाद!