Talathi Bharti Documents Required 2023

तलाठी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे यादी तयार ठेवा!

Maharashtra RFD Talathi Bharti 2023 Application Documents Resquired

1) शैक्षणिक कागदपत्रे

2) शैक्षणिक व्यतिरिक्त कागदपत्रे

3) इतर आवश्यक कागदपत्रे

तलाठी भरती शैक्षणिक कागदपत्रे : Talathi Educational Certificate List

1) शाळा सोडल्याचा दाखला (10 वी, 12 वी, पदवी )

2) 10 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट

3) 12 वीचे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट

4) पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate)

5) पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र (केली असल्यास)

6) इतर शैक्षणिक कागदपत्रे (NSS,NCC, etc)

शैक्षणिक व्यतिरिक्त आवश्यक कागदपत्रे : Talathi Document Verification List

1) अधिवास प्रमाणपत्र (Domacile Certificate)

2) राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र (Nationality Certificate)

3) जातीचा दाखला (Caste Certificate)

4) नॉन क्रिमिलियर (Non Creamy Layer Certificate)

5) जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate)

6) EWS प्रमाणपत्र (आवश्यकतेनुसा)

7) महिला आरक्षण प्रमाणपत्र (फक्त महिलांना लागू असल्यास)

इतर आवश्यक कागदपत्रे : Other Important Talathi Document List

1) अपंग प्रमाणपत्र (Disability Certificate)

2) माजी सैनिक प्रमाणपत्र

3) खेळाडू प्रमाणपत्र (Sport Certificate)

4) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र

5) आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य प्रमाणपत्र

List Of Documents Required For Talathi Exam 2023 | Lists of Documents for Talathi Bharti 2023 Online Apply

पडताळणीकरीता सोबत आणावयाची दस्तएवज यादी.

  • संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या मुळ अर्जाची प्रत.
  • माध्यमिक शालांत परीक्षा / उच्च माध्यमिक शालांत परीक्षा / मान्यताप्राप्त विद्यापीठाची पास असल्याबाबत मुळ गुण पत्रिका / शाळा सोडल्याची दाखल्याची मुळ प्रत.
  • मागासवर्गीय उमेदवारांकरीता ( सामाजिक आरक्षणाअंतर्गत ) मुळ जात प्रमाणपत्र व उपलब्ध असल्यास मुळ जात वैधता प्रमाणपत्र.
  • सामान्य प्रशासन विभागाचे शासन निर्णय क्र. राआधी 4019 /प्र.क्र.31/16 – अ दिनांक 12.02. 2019 अन्वये ई.डब्लु.एस.उमेदवारांसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या पात्रतेसाठीचे मुळ प्रमाणपत्र, एस.ई.बी.सी.उमेदवारांकरीता सक्षम प्राधिकारी यांचेकडील मुळ प्रमाणपत्र.
  • शासन परिपत्रक,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, क्र. सी. बी. सी. -10/2006/प्र.क्र.15// मा.व. क. -5 दिनांक 30.06.2006 नुसार वि.जा.अ./ भ.ज.क./भ.ज.ड./वि.मा.प्र. / इ.मा.व. प्रवर्गातील उमेदवार तसेच एस.ई.बी.सी. उमेदवारांनी दिनांक 31.03.2019 पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे मुळ प्रमाणपत्र. ( Non-Cremelayer )
  • खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी असलेले आरक्षण महिला व बालविकास विभाग, शासन निर्णय क्र.82/ 2001/मसेआ-2000/प्र.क्र.415 / का-2/ दिनांक 25.05.2001 आणि वेळोवेळी आदेशीत करण्यात आलेले शासन निर्णयानुसार आरक्षणाअंतर्गत अर्ज करणा-या महिला उमेदवारांनी दि. 31 मार्च, 2019 पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे मुळ प्रमाणपत्र. (Non-Cremelayer ) माजी सैनिक उमेदवार यांचे सैनिकाचे प्रमाणपत्र व त्यांचे वयाबाबत सैनिक कल्याण बोर्ड यांचेकडुन तपासणी झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येइल. सैनिक कल्याण बोर्ड यांनी त्यांचा अर्ज अपात्र ठरविल्यास त्यांना अपात्र घोषित केले जावून त्यांचे समोरील उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येइल.
  • अंशकालिन उमेदवार यांचे अंशकालिन बाबतचे प्रमाणपत्र संबधीत तहसिलदार व जिल्हा सेवायोजन कार्यालयाकडे पाठविण्यात येवून त्यांचेकडुन प्रमाणपत्र पात्र झाल्यानंतरच त्यांना आदेश निर्गमित करण्यात येइल.
  • उच्च गुणवत्ताधारक खेळाडुसाठी असलेले आरक्षण शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, क्र.राक्रीधो-2002/प्र.क्र. 8 /क्रीयुसे- 02 दिनांक 01.7.2016 व प्रचलित शासन निर्णयानुसार विहीत केलेले प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
  • प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी संबधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी, यांनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त बाबतच्या मुळ प्रमाणपत्राची प्रत.
  • अपंग उमेदवारांनी सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही 1098/प्र.क्र.39/98/16-अ दिनांक 16.06.2001 मधील तरतुदी तसेच जाहीरातीत उल्लेख केल्यानुसार 40% अपंगाचे स्थायी वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • शासन निर्णय क्र.मातंस-2012/प्र.क्र.277/39 दिनांक 4.2.2013 मध्ये नमुद केलेल्या संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक अर्हता परीक्षापैकी कोणतीही एक अर्हता किंवा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत एम. एस. सी. आय.टी अथवा जीईसीटी मध्ये परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र. महाराष्ट्र नागरी सेवा ( लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ) नियम 2005 मधील तरतुदीनुसार गट क ते ड मधील पदांच्या सेवा प्रवेशासाठी लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे.
  • सर्व कागदपत्राची पूर्ण पडताळणी तसेच जाहीरातीत नमुद सर्व निकषांची पुर्तता झाल्यानंतर अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची प्रसिद्ध करण्यात येईल.