अकरावी प्रवेश नोंदणी सुरू झाली मात्र माहिती पुस्तिकाच उपलब्ध नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे…

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली. यंदा दहावीच्या निकालानंतर शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा सर्वच प्रक्रिया ऑनलाइन करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी नोंदणी करत आहेत, मात्र विद्यार्थ्यांच्या हातात माहितीपुस्तिका नसल्याने अनेक बाबतीत संभ्रम निर्माण होत आहेत. याबाबत विद्यार्थ्यांना कोणतेही मार्गदर्शन होत नसल्याने गोंधळ वाढू लागला आहे.

कशी कराल आपली नोंदणी
11th Admission

राज्यभरात मुंबई एमएमआर क्षेत्र तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिकांच्या क्षेत्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. या प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू झाले असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. पहिल्या टप्यातील अर्ज भरल्यानंतर विद्यार्थांना दुसरा टप्पात महाविद्यालय पसंतीक्रम असणार आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायचे असले तरी विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन करावी लागत होती. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन सादर करता येणार आहेत. तसेच त्यांना प्रवेश शुल्कही ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मिळालेला प्रवेश निश्चित करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी कुठेही धावाधाव करू नका, सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आल्या आहेत अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

माहितीपुस्तिकाच नाही

प्रवेशासाठी आवश्यक अशी माहितीपुस्तिका आणि वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हातात पुस्तिकाच नसल्याने कोणत्या कॉलेजांची निवड कशी करावी, त्यांचे शुल्क काय आहे, याची माहितीच विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. अनेकांनी प्रवेशसाठीच्या प्रक्रियेचे शुल्क भरलेले असतानाही त्यांना ते दाखवले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

ग्रेडचे गुणांबाबत दिलासा

आयसीएसई आणि आयजीएससीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना ग्रेडमध्ये गुण दिले जातात. त्यामुळे त्यांना दरवर्षी गुणांमध्ये रूपांतर करण्यासाठी धावपळ करावी लागते. मात्र यंदा यामध्ये बदल करण्यात आला असून विद्यार्थांना प्रवेशाच्या संकेतस्थळावरच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

पहिल्या दिवशी बोर्डनिहाय नोंदणी झालेले विद्यार्थी

 • राज्य शिक्षण मंडळ – १,७२,३५७
 • सीबीएसई – ७,२००
 • आयसीएसई – १०,८२४
 • आयबी – ३५
 • आयजीसीएसई – १,२६०
 • एनआयओएस – २७६
 • इतर – २९५ 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अर्जाचा पहिला भाग कसा भरायचा…जाणून घ्या.

11th Admission 2020: अकरावी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. यावर्षी ११ वी प्रवेशाचा रेजिस्ट्रेशन फॉर्म स्वतः मोबाईल/कॉम्पुटरवर ऑनलाइन भरायचा आहे. लॉकडाऊन असल्यामुळे कदाचित शाळांची मदत विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणावर होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी-पालकांनी काळजीपूर्वक ऑनलाइन अर्ज कसा भरायचा ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत…

ऑनलाइन अर्ज कसा भराल:- Application Process

 • https://mumbai.11thadmission.org.in/Registration/Registration.aspx या लिंकवर क्लिक करावे.
 • सर्व प्रथम वरील लिंकवर क्लिक करा एक फॉर्म दिसेल.
 • एमएमआर रिजनमधील विद्यार्थ्यांनी Within MMR Area वर क्लिक करा. इतरांनी Outside MMR Area तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांनी Outside Maharashtra Area या पर्यायावर क्लिक करा.
 • Fresher वर क्लिक करा.
 • SSC वर क्लिक करा.
 • Seat No. बॉक्स मध्ये तुमचा स्वतःचा 10वी परीक्षा बैठक क्र.(Seat No.) लिहा.
 • उदा. A011025.
 • Seat No.च्या खाली लाल रंगातील Get SSC Data वर क्लिक करा.
 • तुमचे पूर्ण नाव, आईचे नाव व इतर माहिती तुम्हाला दिसेल.
 • Mobile Number बॉक्स मध्ये तुमचा चालू असलेला मोबाईल नं. टाका.
 • Security Question पुढे Select ला क्लिक करा त्यातील एक प्रश्न निवडा, त्याच्या पुढच्या बॉक्स मध्ये त्या प्रश्नाचे उत्तर लिहा.
  • उदा. What is the name of your grandfather?
  • पुढच्या बॉक्स मध्ये तुमच्या आजोबांचे नाव लिहा.
  • (तुम्ही कोणताही प्रश्न निवडू शकता व त्याचे उत्तर लिहून तो प्रश्न व उत्तर लक्षात ठेवा)
 • तुमच्या 11वी ऍडमिशन फॉर्मचा पासवर्ड तुम्ही सेट करा पुढच्या बॉक्स मध्ये परत तोच पासवर्ड लिहा व लगेच ते वहीत लिहून घ्या व लक्षात ठेवा.
 • CAPCHA CODE बॉक्स मध्ये त्या बॉक्स खाली जे दिसते आहे सेम तसेच पाहून लिहा(टाईप करा)
 • वरील तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असेल तर परत एकदा चेक करून खालील हिरव्या Register बटन वर क्लिक करा.