इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात आयपीपीएस परीक्षेच्या ऑगस्टमधील परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत...


IBPS Exams :आयबीपीएसच्या ऑगस्टमधील परीक्षा लांबणीवर

IBPS exams for 9 august 2020 postponed: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने ऑगस्ट २०२० मध्ये होणाऱ्या अनेक भरती परीक्षा स्थगित केल्या आहेत. ९ ऑगस्ट २०२० रोजी देशभरात या परीक्षा होणार होत्या. परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीसही आयबीपीएसने जारी केली आहे.

या नोटीशीत परीक्षेच्या नव्या तारखेबाबतची माहितीदेखील देणअयात आली आहे. यानुसार, आयबीपीएस ९ ऑगस्ट २०२० च्या सर्व परीक्षा आता १२ ऑगस्ट रोजी होणार आहेत.

पुढील परीक्षांच्या तारखा बदलल्या -

  • फॅकल्टी रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड - ४)
  • रिसर्च असोसिएट (पोस्ट कोड - ५)
  • रिसर्च असोसिएट टेक्निकल (पोस्ट कोड - ६)
  • हिंदी ऑफिसर (पोस्ट कोड - ७)
  • अॅनालिस्ट प्रोग्रामर - विंडोज (पोस्ट कोड - ८)
  • एनालिस्ट प्रोग्रामर - लाइनक्स (पोस्ट कोड - ९)
  • आयटी अॅमिनिस्ट्रेटर (पोस्ट कोड - १०)
  • प्रोग्रामिंग असिस्टंट (पोस्ट कोड - ११)

आयबीपीएसने परीक्षार्थींना वेळोवेळी आपल्या संकेतस्थळावर ibps.in येथे जाऊन अद्ययावत माहिती घेण्याची सूचना केली आहे.

परीक्षा लांबणीवर टाकल्याबाबतची नोटीस 


IBPS च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.