महाराष्ट्र पॉलीटेकनिक (तंत्रशिक्षण) प्रवेश २०२०-२१ आज पासून सुरु झाली आहे आपणाला जर ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर खाली सर्व लिंक दिल्या   आहेत संपूर्ण जाहिरात वाचा आणि अर्ज करा...


विद्यार्थ्यांनो, पाॅलिटेक्निक अॅडमिशनच्या तारखा झाल्या जाहीर; वाचा सविस्तर


Maharashtra Polytechnic Admission 2020

Higher Technical Education Minister Uday Samant tweeted about it. The admission process for the first year diploma courses in technical education for the academic year 2020-21 will be implemented from 10th August to 25th August. For the convenience of students, 336 facilitation centers for engineering diploma admission and 242 facilitation centers for post-secondary diploma courses have been selected in the state.

इयत्ता १०वीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेला तरी अद्याप पाॅलिटेक्नीकची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार याची विद्यार्थी वाट पाहात होते, मात्र त्यांची ही प्रतिक्षा संपली आहे. कारण आता १० ऑगस्टपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.

उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी तंत्रशिक्षणातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधाकेंद्रांची आणि बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे.

 कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन पद्धतीने करू शकतील, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्या पर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील.प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि e-Scrutiny पद्धतीची माहिती ,अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती , हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सामंत यांनी संगितले.


 प्रवेश करता खाली दिलेला लिंक वर क्लिक करा आणि अर्ज करा...

Post SSC 10 वी Diploma Admissions 2020 - 21


Post HSC 12 वी Diploma Admissions 2020 - 21


  वेळापत्रक

१० ते २५ ऑगस्ट – ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, कागदपत्रे स्कॅन छायाप्रती अपलोड

करणे आणि छाननीची योग्य पद्धत निवडणे.

११ ते २५ ऑगस्ट – कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे.

२८ ऑगस्ट – तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.

२९ ते ३१ ऑगस्ट – तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना तक्रार असल्यास, तक्रार करणे.

२ सप्टेंबर – अंतिम गुणवत्ता याद्या प्रदर्शित करणे.

पदविका अभ्यासक्रम व मागील वर्षीच्या जागा पदविका अभ्यासक्रम शासकीय अशासकीय एकूण अनुदानित वि अनुदानित


प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी १७ ७५१ ३८९० ८६३९२ १०८०४१

द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी ७१०५ — — ८२२५७

औषधनिर्माणशास्त्र २१० ११५० २२९०१ २४२६१

हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग टेक्नोलॉजी १२० ० ६० १८०

सरफेज कोटिंग टेक्नोलॉजी — ४० ० ४०