NEET 2020: अखेरच्या दिवसांमध्ये कसा कराल अभ्यास?

NEET Preparation Last Few Days Revision Plan

 

NEET Preparation Last Few Days Revision Plan : नीट परीक्षेच्या तयारीसाठी अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. या शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास कसा करावा जाणून घ्या

NEET 2020 Preparations: देशभरातील विविध शासकीय आणि अन्य मेडिकल कॉलेजमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेतली जाणारी नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्था NEET 2020 येत्या १३ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांकडे या परीक्षेच्या तयारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्ही कोविड-१९ संसर्ग स्थिती आणि लॉकडाऊनमुळे घरात बसूनच तयारी करत आहात. तुम्हाला कोणतीही रेडिमेड मदत मिळणार नसल्याने थोडी अधिक मेहनत करावी लागत आहे. म्हणूनच नियमित, सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध अभ्यासावर भर द्या. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने तयार केली आहे त्यावर अवलंबून असलेली तुमची स्पर्धात्मक क्षमता आणि ज्ञान याची कसोटी म्हणजे ही परीक्षा आहे. त्यामुळे घरबसल्या

नीट २०२० ची तयारी कशी करायची त्याबाबतच्या टिप्स लक्षात घ्या….

शेवटच्या दिवसांमधील उजळणीसाठी टिप्स

जे आधी वाचलंय त्यावर अखेरचा हात फिरवा

शेवटच्या २०-२५ दिवसात नवे विषय हाताळणे टाळलेलेच बरे. त्याऐवजी जे टॉपिक तुम्ही छान पद्धतीने आत्मसात केले आहेत, त्यांची उजळणी करा.

मॉडेल ग्रँड टेस्ट्स

शेवटच्या १५ दिवसात जितक्या शक्य तितक्या NEET Model Grand Tests द्या. यामुळे पेपरचं आकलन आणि तयारी पूर्ण होईल. मॉक टेस्टमुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जमेल. या स्पर्धा परीक्षांमध्ये वेळेला अतोनात महत्त्व असतं.

स्मार्ट अभ्यास

प्रभावी अभ्यासासाठी स्मार्टपणे अभ्यास करणे गरजेचे असते. तुमची बळकट स्थाने, कमजोर स्थाने ओळखा. त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवा.

फॉर्म्युला आणि नोट्स

स्वत:च्या नोट्सचा अभ्यास करा. महत्त्वाचे फॉर्म्युले हायलाइट करून ठेवा. दिवसभरातून एकदा या महत्त्वाच्या फॉर्म्युल्यांवर नजर मारा.

नोट्सची उजळणी करा

तुम्ही किती अभ्यास पूर्ण केल्या यापेक्षा तुम्ही अभ्यास किती नीट केलाय यावर नीट परीक्षेतील कामगिरी ठरेल. यासाठी दररोज नोट्सची उजळणी करा. सिलॅबसची विभागणी करून उजळणी करा. नोट्स या वेळेची बचत करणाऱ्या आणि नियोजनबद्ध अभ्यासासाठी असतात. हायलाइट केलेले मुद्दे, विभाग नोट्समध्ये असावेत.

मागील वर्षांचे प्रश्न

तुमची तयारी किती चोख आहे हे पाहण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा. नीटचा अभ्यास खूप व्यापक असतो. त्यामुळे काही भाग राहून जाणे स्वाभाविक आहे. म्हणूनच मागील प्रश्नपत्रिका सोडवताना बहुतांश प्रश्नांचे स्वरुप स्पष्ट होईल.

परीक्षेतील अचुकता आणि वेळेचे व्यवस्थापन

वेळेचे व्यवस्थापन आणि अॅक्युरसीच्या स्वत:च्या पद्धती शोधून काढा. कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते नाही याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात स्पष्टता हवी.

आरोग्य चांगले राखा

सद्यस्थिती पाहता, करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या. अभ्यास करताना मध्ये थोडा ब्रेक घ्या. विश्रांती घ्या. दररोज किमान ते तास झोप घ्या. चांगला आहार घ्या. खूप पाणी प्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नका.


NEET 2020 : यंदा प्रथमच नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांची माहिती लवकर कळणार आहे

NEET 2020 Exam Centre City Update: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (MBBS / BDS) होणारी नीट (NEET) प्रवेश परीक्षेसंदर्भात एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राष्ट्रीय टेस्टिंग एजन्सी (एनटीए) ने आपले अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in वर हे परिपत्रक जारी केले आहे.

नीट २०२० च्या परीक्षा केंद्रांच्या बाबतीत महत्त्वाची माहिती या परिपत्रकात देण्यात आली आहे. एटीए पहिल्यांदाच नीटच्या विद्यार्थ्यांना ही सुविधा देत आहे. दरवेळी परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असेल, याची माहिती अॅडमिट कार्ड म्हणजेच प्रवेश पत्रात दिली जाते. पण यावर्षी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ही माहिती आधी मिळत आहे.

एनटीएने दिलेल्या माहितीनुसार, सध्यस्थितीत अॅडमिट कार्ड मिळायच्या आधीच एनटीए आणि नीटच्या अधिकृत संकेतस्थळांवर परीक्षार्थींना त्यांच्या परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती दिली जात आहे, जेणेकरून आयत्या वेळी त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची कसरत करावी लागू नये. जर परीक्षा केंद्राचे शहर त्यांच्या वर्तमान शहरापेक्षा वेगळं असेल तर तेथे पोहोचण्याची तयारी त्यांना करता येईल.

आपल्या परीक्षा केंद्राच्या शहराचे नाव या वृत्ताच्या अखेरीस दिलेल्या लिंकवरून तपासता येईल.

अॅडमिट कार्डची माहिती

या परिपत्रकात एनटीएने हेही सांगितले आहे की नीट २०२० साठी लवकरच अॅडमिट कार्ड जारी केले जातील. अॅडमिट कार्डमध्ये विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि पत्ता, प्रश्नपत्रिकेचे माध्यम (भाषा), रिपोर्टिंग आणि एंट्री टाइम, परीक्षा केंद्राचे गेट बंद होण्याची वेळ आदी माहितीचा समावेश असेल.

एनटीएद्वारे नीट २०२० चे आयोजन १३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी ते सायंकाळा वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

हेल्पलाइन क्रमांक

नीट २०२० संबंधी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर थेट एनटीएशी संपर्क साधता येईल. पुढे दिलेल्या ईमेल वा संपर्क क्रमांकाद्वारे एनटीएशी संपर्क साधता येईल

ईमेल आयडी – neet@nta.ac.in

संपर्क क्रमांक

  • ८२८७४७१८५२
  • ८१७८३५९८४५
  • ९६५०१७३६६८
  • ९५९९६७६९५३
  • ८८८२३५६८०३