UPSC Exam Time Table - 2021 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

UPSC Exam Time Table


UPSC Exam Time Table  : यूपीएससीतर्फे २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत

UPSC Exam Calendar 2021: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. या कॅलेंडरमध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Civil Services 2021) सह इतर परीक्षांचे वेळापत्रक देण्यात आले आहे. आयोगाने अधिकृत संकेतस्थळ upsc.gov.in वर हे वेळापत्रक जारी केले आहे.

येथे तुम्हाला २०२१ मध्ये यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या सर्व मुख्य परीक्षांची माहिती आणि तारखांविषयी माहिती देत आहोत. तसेच आयोगाने जारी केलेल्या दिनदर्शिकेची थेट लिंकही देण्यात येत आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही यूपीएससी परीक्षा कॅलेंडर २०२१ डाउनलोड करू शकता. कोणत्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल आणि शेवटची तारीख कोणती असेल हे कॅलेंडरमध्ये नमूद केले आहे.

UPSC Exam Calendar 2021: कधी होणार कोणती परीक्षा?


  • कम्बाइंड जिओ सायंटिस्ट पूर्व परीक्षा २०२१२१ फेब्रुवारी २०२१
  • सीडीएस परीक्षा फेब्रुवारी २०२१
  • यूपीएससी आरटी परीक्षा२१ फेब्रुवारी २०२१
  • यूपीएससी आरटी परीक्षा मार्च २०२१
  • सीआयएसएफ एसी (एक्झिक्युटिव्ह) एलडीसीई१४ मार्च २०२१
  • एनडीए आणि एनए परीक्षा () – १८ एप्रिल २०२१
  • यूपीएससी आरटी परीक्षा (ईपीएफओ) – मे २०२१
  • सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा २०२१२७ जून २०२१
  • आयएफएस पूर्व परीक्षा२७ जून २०२१
  • यूपीएससी आरटी परीक्षा जुलै २०२१
  • आयईएस / आयएसएस१६ जुलै २०२१
  • संयुक्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा१७ जुलै २०२१
  • अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा१८ जुलै २०२१
  • सीएपीएफ परीक्षा ऑगस्ट २०२१
  • संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा२९ ऑगस्ट २०२१
  • यूपीएससी आरटी परीक्षा२९ ऑगस्ट २०२१
  • एनडीए आणि एनए परीक्षा (2) – सप्टेंबर २०२१
  • यूपीएससी आरटी परीक्षा१२ सप्टेंबर २०२१
  • नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२११० ऑक्टोबर २०२१
  • सीडीएस () – १४ नोव्हेंबर २०२१
  • आयएफएस मुख्य परीक्षा२१ नोव्हेंबर २०२१
  • एसओ / स्टेनो (एलडीसीई) – ११ डिसेंबर २०२१

UPSC Civil Services Mains 2020: या आहेत तारखा

कॅलेंडरमध्ये मुख्य परीक्षेच्या तारखाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, आयोग जानेवारी २०२१ पासून नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० घेईल. परीक्षा , , १०, १६, १७ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येतील. तर, भारतीय वन सेवा (आयएफएस) मुख्य परीक्षा २०२० चे आयोजन २८ फेब्रुवारी २०२१ पासून करण्यात येईल. या परीक्षा मार्च २०२१ पर्यंत चालतील.