JEE मेन 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी!!
JEE
Main 2020 Exam
जेईई मेन २०२० परीक्षेचे अॅडमिट
कार्ड जारी.
कसे कराल
डाऊनलोड… जाणून
घ्या
JEE Main Admit Card 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन २०२० परीक्षेचे अॅडमिट कार्ड (प्रवेश पत्र) अधिकृत संकेतस्थळ jeemain.nta.nic.in वर उपलब्ध केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत ते या संकेतस्थळावरून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करू शकतात. जेईई मेन (एप्रिल) परीक्षा २०२० यावर्षी १ ते ६ सप्टेंबर २०२० दरम्यान होणार आहे.
ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ अशा दोन सत्रांमध्ये परीक्षा होईल.
जेईई मेन २०२० असे करा अॅडमिट कार्ड डाऊनलोड
– सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in वर जा
– यानंतर JEE Main Admit Card 2020 लिंक वर जा
– आपला अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका
– यानंतर सबमीट बटण वर क्लिक करा
– अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर येईल
– तुम्ही अॅडमिट कार्ड डाऊनलोड करून प्रिंटआऊट घेऊ शकाल.
परीक्षा कशी होईल?
जेईई मेन २०२० परीक्षा पुढील पद्धतीने होणार आहे –
- १) बी.ई./
बी. टेक्. साठी परीक्षा संगणक आधारित (कॉम्प्युटर बेस्ड) पद्धतीनेच होईल.
- २) B. Arch: Mathematics- Part I and Aptitude Test-Part
II संगणक आधारित आणि ड्रॉइंग टेस्ट – Part III पेन आणि पेपर म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने होईल.
- ३) B. Planning: Mathematics- Part I, Aptitude Test-Part
II आणि Planning Based Questions-Part III या विषयांसाठी परीक्षा संगणक आधारित (CBT) पद्धतीने होईल.
JEE Main 2020 Exam: परीक्षेला
जाताना पुढील
सूचनांचे पालन
करा.
- – करोना विषाणूमुळे परीक्षा केंद्रांवर तपासणी आणि सॅनिटायझेशनमध्ये अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्याआधी किमान १
तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे.
- – एनटीएचे संचालक विनीत जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यासाठी टाइम स्लॉट दिला जाईल. विद्यार्थ्यांनी या टाइम स्लॉटचे काटेकोर पालन करत दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचायचे आहे.