भारतीय सैन्य दलात भरती
Indian Army Recruitment 2020
Indian Army Recruitment 2020 : भारतीय सेना येथे लघु सेवा आयोग तांत्रिक 56 (पुरुष), लघु सेवा आयोग तांत्रिक 27 (महिला) करिता एकूण 191 जागा रिक्त आहेत. इंजिनिअरिंगच्य़ा कोणत्याही शाखेतून पदवी मिळविणाऱ्यांसाठी (BE / BTech) भारतीय़ सैन्यात सेवा देण्याची संधी चालून आली आहे. इंजिनिअर पदवीधारकांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) टेक्निकल कोर्स अंतर्गत जागा निघाल्या आहेत. यामध्ये पुरुष आणि महिला या दोन्हींसाठी भरती होणार आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2020 आहे.
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
1 | SSC (T)-56 & SSCW (T)-27 | पुरुष | महिला |
175 | 14 | ||
2 | Widows of Defence Personnel only | ||
SSC(W) (Non Tech) (Non UPSC) | 01 | ||
SSC (W) (Tech) | 01 | ||
Total | 191 |
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ज्वाईन इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर joinindianarmy.nic.in जाऊन अर्ज करावा लागणार आहे. अर्जाची लिंक आजपासून सुरु केली जाणार आहे. तेव्हाच या भरतीची सारी माहिती दिली जाणार आहे. अद्याप या वेबसाईटवर याची माहिती अपलोड झालेली नाही. य़ामुळे इच्छुकांना थोड्या वेळाने वेबसाईट पहावी लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 नोव्हेंबर 2020 असून कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजेच ही प्रक्रिया निशुल्क आहे.
- कोर्सचे नाव – लघु सेवा आयोग तांत्रिक 56 (पुरुष), लघु सेवा आयोग तांत्रिक 27 (महिला)
- पद संख्या – 191 जागा
शैक्षणिक पात्रता:
- SSC (T)-56 & SSCW (T)-26: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.
- SSC(W) (Non Tech) (Non UPSC): कोणत्याही शाखेतील पदवी.
- SSC (W) (Tech): B.E/B.Tech
वयाची अट:
- SSC (T)-56 & SSCW (T)-27: जन्म 02 एप्रिल 1994 ते 01 एप्रिल 2001 दरम्यान.
- Widows of Defence Personnel: 01 एप्रिल 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत.
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2020 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात:- येथे पाहा
· ऑनलाईन अर्ज करा :- येथे पाहा
· अधिकृत वेबसाईट:- येथे पाहा
आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा
लगेच शेयर करा.....