MHADA recruitment Exam Cancled - Read notification

म्हाडा सरळसेवा भरती २०२१ करीत क्लस्टर -१,३,४ करीता दि. १२-१२-२०२१ रोजी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार होती. तथापि, दि. ११-१२-२०२१ रोजी परीक्षा प्रक्रिया पार पाडण्याकरीता नेमणूक केलेल्या एजन्सीच्या संचालकांना पुणे सायबर पोलिसांनी गोपनीयतेचा भंग प्रकरणी अटक केल्याने दि. १२-१२-२०२१ रोजीची नियोजित परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली. म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रिया पारदर्शी व सुरळीतपणे व्हावी तसेच पदभरती मध्ये गुणवत्ताधारक उमेदवारावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याकरिता परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. तथापि, परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने दि. १२-१२-२०२१ रोजी होणाऱ्या नियोजित परिक्षेकरीता अर्ज केलेल्या उमेदवारांनी झालेला त्रास विचारात घेऊन त्यांना परीक्षा शुल्क परतावा करण्यात येत आहे. उमेदवारांनी ज्या बँकमधून परीक्षा शुल्क भरणा केला आहे त्या खात्यावर पैसे जमा झाल्याबाबत खातरजमा करावी.

म्हाडा परीक्षा रद्द झालेली आहे अधिकृत माहितीसाठी लिंकवर क्लिक करा 

Official Notification Click here