रिझ्यूम' तयार करताय? मग तुमच्यासाठी
नोकरी मिळवण्यासाठी तुमचा 'रिझ्युम' (सीव्ही) ताकदीचा असायला हवा. तुमची कौशल्ये व जॉबसाठी आवश्यक असलेली कौशल्ये सीव्हीमध्ये दिसायला हवी. इतर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया जेणेकरून आपला 'रिझ्यूम' चांगला बनेल.
'रिझ्यूम' चांगला बनवण्यासाठी खास टिप्स :
● तुमचा 'रिझ्यूम' हि तुमची ओळख आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुमची सर्व माहिती, अनुभव, आवडी- निवडी, विशेष गुण, कौशल्य यांची माहिती अधोरेखित झाली पाहिजे.● तुमचे शिक्षण, कोसेर्सची माहिती, त्याबद्दल व्यवस्थित माहिती असली पाहिजे.
● तुम्ही जो 'रिझ्यूम' तयार केला आहे. त्याबद्दल सखोल माहिती ठेवा. कारण मुलाखत घेणार्याकडून त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात.
● शिक्षण तसेच आधीच्या नोकरीत मिळवलेले विशेष प्राविण्य 'रिझ्यूम'मध्ये कसे उठून दिसेल याची काळजी घ्या.
● तुमच्या आवडी-निवडी, छंद लिहिताना काळजी घ्या. ते अवास्तव असायला नको. अन्यथा यामुळे वेगळाच पेच उभा राहू शकतो.
● सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रिझ्यूम'मध्ये अनावश्यक गोष्टी लिहणे कटाक्षाने टाळाच.