अल्पसंख्याक तरुणांना मिळणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
Police
Bharti Free Training for minority candidates: Minority Development Minister
Nawab Malik said that pre-recruitment training would be imparted to more and
more minority youths in the state. At present, the process of selection of
aspiring trainees from 14 districts of the state has been started for this
training and it will be started soon in the remaining districts as well, he
said.
राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. सध्या या प्रशिक्षणासाठी राज्यातील 14 जिल्ह्यांमधून इच्छुक प्रशिक्षणार्थी उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्येही ती लवकरच सुरु केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
सध्या फक्त निवड प्रक्रिया सुरु असून कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य शासनाच्या यासंदर्भातील नियमानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण नंतर सुरु करण्यात येईल, असं ते म्हणाले. राज्यात चालू वर्षाअखेर 12 हजार 500 पोलिसांची भरती करण्याचे गृह विभागामार्फत प्रस्तावित आहे. या भरतीमध्ये राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी, जैन आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळण्याच्या अनुषंगाने त्यांची तयारी करुन घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
उमेदवारांना सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या वर्धा, गडचिरोली, अमरावती, नांदेड, जालना, पुणे, यवतमाळ, परभणी, सोलापूर, औरंगाबाद, बुलडाणा, नाशिक, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे किंवा त्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेकडे अर्ज करावयाचा आहे.
उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड प्रक्रिया करण्यात येत असून त्यानंतर सदर जिल्ह्यांमध्येही
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील, असं मंत्री मलिक यांनी सांगितले.
शिकवणार काय?
’
प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक सामान्य ज्ञान, इतर माहिती, शारीरिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
’
याशिवाय प्रत्येक उमेदवाराला ट्रॅकसूट आणि बूट खरेदीसाठी १ हजार रुपये, पुस्तकांच्या खरेदीसाठी ३०० रुपये, प्रतिमहिना १ हजार ५०० रुपये याप्रमाणे दोन महिन्यांसाठी ३ हजार रुपये विद्यावेतन आणि प्रशिक्षण कालावधीत दररोज न्याहारी देण्यात येणार आहे. प्रशिक्षण दोन महिन्यांचे असेल.
’ प्रत्येक जिल्ह्य़ात कमाल १०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.