पदवी परीक्षा... एक तास, ५० गुण?

Final Year Exam 2020 Exam Duration Will Be Likely One Hour, Question Paper Likely To Be Of 50 Marks


अंतिम वर्षाची परीक्षा किती वेळ, किती गुणांची असेल याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता आहे....


अंतिम वर्षाची परीक्षा ही तीन तासांऐवजी एक तासांची होईल. तसेच १०० गुणांऐवजी ५० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षा घेण्यात येणार असल्याचे संकेत शुक्रवारी उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. मात्र, या परीक्षा घेताना तंत्रज्ञानावर भर देण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. तसेच लेखी परीक्षांसाठी विद्यापीठाला बहुपर्यायी प्रश्न, असाइन्मेंट किंवा ओपन बुकचे पर्यायही खुले केले आहेत. तसेच प्रात्याक्षिक परीक्षा विविध मिटिंग ॅप किंवा टेलिफोनिक पद्धतीने घेण्याच्या सूचनाही सामंत यांनी केल्या आहेत. परीक्षा पद्धती, वेळापत्रक अभ्यासक्रम सप्टेंबरपर्यंत सरकारकडे सादर करावेत, अशा सूचना त्यांनी विद्यापीठाला दिल्या.

काही महत्त्वाच्या शिफारशी

-
राज्यातील सर्व विद्यापीठांची गुणवत्ता राखणे आवश्यक आहे. विद्यापीठांची विषम परिस्थिती लक्षात घेऊन कमी कालावधीच्या परीक्षा विद्यापीठांनी घ्याव्या. त्या ऑनलाइन पद्धतीने घ्याव्या. ऑनलाइन शक्य नसेल तिथे ऑनलाइन आणि ऑफलाइन संमिश्र किंवा तेही शक्य नसेल तिथे पेन-पेपरने परीक्षा घ्याव्या. मात्र, परीक्षा विद्यार्थ्यांना घरबसल्याच देता यायला हव्यात. एमसीक्यू, ओेएमआर, असाइनमेंट पद्धत, ओपन बुक टेस्ट या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय स्वीकारावा.

-
दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधांसह, त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या परीक्षा घ्यायच्या आहेत.

-
विशेष बाब म्हणून, विद्यार्थी एखाद्या विषयाला कोणत्याही कारणास्तव बसू शकला नाही, तर त्या विद्यार्थ्याला त्या विद्यापीठाने पुन्हा परीक्षेची संधी द्यायची आहे.

-
प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षांसाठी मीटिंग अॅप्स किंवा टेलिफोनचा वापर करावा.

-
अंतिम वर्ष अंतिम सत्र विद्यार्थ्यांचे बॅकलॉग पेपर (एटीकेटी) याच पर्यायांनी घेण्यात यावेत.

विद्यापीठांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन परीक्षा घेण्यात अडचण असल्यास त्याची माहिती तातडीने सरकारला कळवावी. जेणेकरून परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात यूजीसीला कळवून मुदतवाढ घेण्यात येईल
.

 लगेच शेयर करा.....

 

SJMK, Government JOB, Sarkari Naukari, Latest Government Jobs, Private Jobs In Maharashtra, Police Bharti, Bank Bharti , ZP Bharti , Army Bharti , Mpsc, Free Job Alert, sakarinokari, ssc, Army, Latest Job Maharashtra, MPSC, police Bharti, Mock Test, Practice Paper online, mahapariksha.gov.in, nmk co in, mahanews, nmk,  mahaonline, mahatribal,job sites, federal employees, it jobs, job search, jobs, job openings, job seekers, job agencies, government jobs, bank, insurance, whatsapp webibps ssc, CRPF,exam,final year exam