IBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर!!

IBPS RRB Exam

 

 


IBPS RRB Exam : IBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे

IBPS RRB Exam

IBPS RRB Exam : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्डाने IBPS RRB पूर्व परीक्षा लांबणीवर टाकली आहे. ही परीक्षा १२ आणि १३ सप्टेंबर रोजी होणार होती. ‘काही अपरिहार्य कारणांमुळे IBPS RRB पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे,’ असं परिपत्रकात म्हटलं आहे.

IBPS च्या संचालकांनी सोमवारी हे परिपत्रक जारी केलं. ‘काही अपरिहार्य कारणांमुळे १२ आणि १३ सप्टेंबर २०२० रोजी होणाऱ्या ऑनलाइन पूर्व परीक्षा आयोजित करणे शक्य होणार नाही,’ असे या परिपत्रकात म्हटले आहे.

आयबीपीएस आरआरबी परीक्षेच्या सुधारित तारखा आयबीपीएस लवकरच जाहीर करणार आहे.

उमेदवारांना हे परिपत्रक पुढील थेट लिंकवर क्लिक करून मिळवू शकता.

IBPS RRB 2020 परीक्षा लांबणीवर टाकण्यासंदर्भातील परिपत्रक – https://www.ibps.in/wp-content/uploads/IMPORTANTnNOTICE.pdf

गट अधिकारी आणि गट ऑफिस असिस्टंट पदाच्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. पूर्व आणि मुख्य अशा दोन टप्प्यांतील ऑनलाइन परीक्षा ऑफिसर स्केल आणि ऑफिस असिस्टंट पदांसाठी होणार आहे.

 

आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा



 लगेच शेयर करा.....