बंपर भरती – SBI हजारो जागा भरणार!! तयारीला लागा!

SBI Recruitment 2020

 


SBI Recruitment 2020 – Job Vacancies : स्टेंट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) मोठी भरती काढणार असून पुढील तीन महिन्यांत 14000 जागा भरल्या जाण्याची शक्यत आहे. एसबीआय (SBI) ने आजच 30000 जुन्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर ही भरती केली जाणार आहे.

SBI Recruitment 2020

SBI Recruitment 2020 – Job Vacancies : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ३० हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे.एसबीआयकडून स्वेच्छानिवृत्ती योजनेवर काम सुरू आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत एसबीआयच्या कर्मचाऱ्यांची संख्या .४९ लाख इतकी होती. त्यातील ३० हजार १९० कर्मचाऱ्यांना आता कायमस्वरूपी घरी बसावं लागू शकतं. व्हीआरएससाठी एक आराखडा तयार करण्यात आला असून तो बोर्डाची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. ३० हजारांमध्ये ११ हजार ५६५ अधिकारी आणि १८ हजार ६२५ कर्मचाऱ्यांचा समावेश असेल. याआधी २००१ मध्ये एसबीआयनं व्हीआरएस योजना आणली होती.

 

यामुळे या कर्मचाऱ्यांच्य़ा रिक्त जागांवर हे ताज्या दमाचे कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. ‘ऑन टॅप व्हीआरएसही योजना स्टेट बँकेत लागू होण्याची शक्यता आहे. एसबीआयही कर्मचारी फ्रेंडली आणि विस्तार करणार असल्याने पुढील काळात १४००० जागांवर भरती केली जाणार आहे, असे स्टेट बँकेतील सुत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

एसबीआयच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ३१ मार्च २०२० रोजी .४९ लाख इतकी आहे. हाच आकडा मार्च २०१९ मध्ये .५७ लाख इतका होता. खर्च कमी करण्यासाठी एसबीआयनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दोन हजार कोटी रुपये वाचतील, असा बँकेचा अंदाज आहे.


आमचे स्पर्धा परीक्षा सराव पेपर मोफत सोडवा लगेच शेयर करा.....