NEET 2020 Counselling: पहिल्या फेरीला सुरूवात



Maharashtra NEET 2020 Counselling


Maharashtra NEET 2020 Counselling: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नीट काऊन्सेलिंग २०२० ला सुरुवात केली आहे. MBBS, BDS आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी ही समुपदेश फेरी सुरू झाली आहे. विद्यार्थी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नीट काऊन्सेलिंग २०२० साठी नोंदणी करू शकतात. नोंदणी आणि शुल्क भरण्याची अखेरची तारीख १२ नोव्हेंबर २०२० आहे.

एमबीबीएस, बीडीएस अशा वैद्यकीयच्या पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले असून, इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने १२ नोव्हेंबरपर्यत नोदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे कॉलेजांचे पर्याय ६ ते १३ नोव्हेंबरच्या कालावधीत भरावे लागणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या, नीट प्रवेश परीक्षेचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर झाला. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली नव्हती. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची वाट विद्यार्थी आणि पालक पाहत होते. अखेर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ नोव्हेंबरपर्यत वेबसाइटवर नोदणी करायची आहे. त्यानंतर ६ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत केवळ एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी कॉलेजांचे पर्याय भरता येणार आहे. त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता जाहीर करण्यात येईल. प्रवेशाची पहिली निवड यादी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे. या निवड यादीत प्रवेश जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यत कॉलेजमध्ये जाउन प्रवेश घ्यावा लागणार आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वेळापत्रक काही दिवसांत

बीएचएमएस, बीएएमएस, बीपीटीएच, बीयूएमएस, बीओटीएच, बीएस्सी नर्सिंग, बीएएसएलपी, बीपी अँड ओ अशा अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक येत्या काही दिवसांत जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेची अधिक माहिती, नोंदणी प्रक्रिया, वेळापत्रक यासाठी www.mahacet.org या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन सीईटी सेलने केले आहे.

महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२० पहिल्या फेरीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

  • ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरणे – ५ ते १२ नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
  • प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी – १३ नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ८ वाजेपर्यंत)
  • पहिल्या फेरीचा निकाल – १५ नोव्हेंबर (सायंकाळी ५ नंतर)
  • कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्याची मुदत – २० नोव्हेंबर २०२० (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग २०२०: कशी कराल नोंदणी?… जाणून घ्या :-

  • – अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • – होम पेजवरील उजवीकडील ‘NEET UG 2020 (CAP Portal)’ वर क्लिक करा.
  • – आता ‘New Registration and Payment’ वर क्लिक करा.
  • – रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
  • – अर्ज भरा. पासवर्ड निवडा आणि सबमिट करा.
  • – यूजरनेम / मोबाइल क्रमांक, पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • – नोंदणी शुल्क भरा.

अर्ज भरण्यापूर्वी नीट यूजी २०२० माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचा. ही माहिती पुस्तिका संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येईल. या वृत्ताच्या अखेरीस ही माहिती पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंकही देण्यात येत आहे.

·  महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

·  महाराष्ट्र नीट काऊन्सेलिंग माहिती पुस्तिका वाचण्यासाठी येथे क्लिक करा.